आवश्यक माहिती बक्षीसपञ सविस्तर माहिती | Gift Deed
बक्षीसपञ काय असते |
बक्षीसपञाव्दारे संपत्तीचे हस्तांतरण | Transfer of Assets |
Gift Deed
सध्या संपत्तीच्या कायद्याबाबत अनेक लोकांमध्ये असमंजस अथवा परिपूर्ण माहिती नसल्याने बऱ्याच वेळा त्यांच्याकडून संपत्तीच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जातात व ते निर्णय पुढे जाऊन घातक ठरतात व असाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत तो प्रकार म्हणजे बक्षीस पत्र आपले कायदे या ब्लॉग वर
मित्रांनो बक्षीस पत्र हे नात्यातील अथवा अन्य लोकांमध्ये संपत्तीचे हस्तांतरण करण्यासाठी केले जाते मात्र सदरची हस्तांतरण हे रक्ताच्या नात्यातील असतील तर ते अतिशय योग्य व त्यासाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी ही कमी स्वरूपाचे असते तसेच बक्षीस पञ स्वेच्छेने व कोणत्याही मोबदल्याचा विना अट विना शर्त स्थावर व जंगम मालमत्तेचे बक्षीस पञ केले जाते
कलम 122 अन्वये बक्षीस पत्र द्वारे होणारे हस्तांतरण हे सध्या अस्तित्वात असलेल्या संपत्तीचे अथवा एखादी व्यक्ती त्या संपत्तीची सध्या मालक असेल अशाच संपत्तीचे बक्षीस पत्र केले जाते अन्यथा त्याचे बक्षीस पत्र होणार नाही एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती येणारी असेल परंतु सध्या ती आलेली नसेल तर तो व्यक्ती सदर संपत्तीचे बक्षीस पत्र करू शकत नाही
मित्रांनो बक्षीस पत्र हे नात्यातील अथवा अन्य लोकांमध्ये संपत्तीचे हस्तांतरण करण्यासाठी केले जाते मात्र सदरची हस्तांतरण हे रक्ताच्या नात्यातील असतील तर ते अतिशय योग्य व त्यासाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी ही कमी स्वरूपाचे असते तसेच बक्षीस पञ स्वेच्छेने व कोणत्याही मोबदल्याचा विना अट विना शर्त स्थावर व जंगम मालमत्तेचे बक्षीस पञ केले जाते
Transfer of Property Act 1882 sec - 122
what is gift deed in india |
बक्षीस पत्र कायदा
Gift deed rules| बक्षीस पत्राचे नियम |
बक्षीस पत्र कोण करू शकतो |
बक्षीस पत्र कोण करू शकत नाही
बक्षीस पत्र करून घेणाऱ्या व्यक्ती हा बक्षीस पत्र करून घेण्यासाठी सक्षम व प्रौढ असावा तसेच तो हे वेडा दिवाळखोर अथवा एखाद्या न्यायालयाने कॉन्टॅक्ट करण्यासाठी अपात्र घोषित केलेला नसावा तसेच त्याचीही मुक्त सहमती असावी जर एखाद्या अ प्रौढ व्यक्तीच्या हक्कात बक्षीस बक्षीस पत्र केले जात असेल तर त्यासाठी त्याच्या पालकांची सहमती असणे आवश्यक आहे
बक्षीस पत्र कधी करता येते|बक्षीस पत्राचे नियम |
gift deed rules |Bakshish patra rules in marathi
बक्षीस पत्र हे दोन्ही पक्षाच्या मुक्त संमतीने करण्यात यावे माञ अशी स्वीकृती देणगीदाराच्या हयातीत आणि देण्यास सक्षम असतानाही केली जावी.जर स्वीकृत होण्यापूर्वीच बक्षीस पञ घेणाऱ्याचा अथवा देणाऱ्याचा मृत्यू झाला तर सदर बक्षीस पञ हस्तांतरण शून्य आहे.
Gift deed Movable property
चल संपत्ती बक्षीस पत्र हे चल संपत्ती चे केले जाऊ शकते मात्र ते करणे फारसे फायद्याचे नसते त्यात रोख रक्कम अन्यथा इतर संपत्ती बक्षीस पत्र व्यतिरिक्त हस्तांतरित केली जाऊ शकते मात्र आयकर विभागाच्या होणाऱ्या कार्यवाहीसाठी बक्षीस पत्र केले तर भविष्यात आयकर विभागाने संपत्तीचे विवरण अथवा आवागमन संबंधी माहिती विचारल्यास सदर बक्षीस पत्र त्यांना पुरावा म्हणून दाखवू शकता
Gift deed Immovable property
अचल संपत्ती सदर संपत्ती प्रकाराचे बक्षीस पत्र करणे गरजेचे व महत्त्वाचे असते त्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण होत असते व संपत्ती घेणारा व्यक्ती याच बक्षीस पत्राच्या आधारे संपत्तीचा कायदेशीर मालक होऊ शकतो त्यामुळे सदर संपत्तीचे बक्षीस पत्र करणे गरजेचे व शहाणपणाचे असते
Transfer of Property Act 1882 Sec 123
What is the validity of gift deed? |
Registration of Gift Deed
a registered gift deed signed by the donor and the donee and attested by two witnesses
Immovable property
अचल संपत्ती कलम 123 अन्वये अचल संपत्तीचे बक्षीस पत्र करणे गरजेचे सांगितले आहे
Movable property
चल संपत्ती कलम 123 अन्वये बक्षीस पत्र करणे गरजेचे नाही मात्र ती संपत्ती विना बक्षीस पात्राने हस्तांतरित केली जाऊ शकते मात्र भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी चलसंपत्तीचे बक्षीस पत्र करणे शहाणपणाचे ठरेल
कलम 123 अन्वये
संपत्तीचे बक्षीस पत्र कोण करू शकते |
Who can make a property award letter?
संपत्ती देणाऱ्या व्यक्तीबाबत सांगण्यात आले आहे
1 ] Self Acquired Property
1 ] Self Acquired Property
संपत्ती ही संपत्ती देणाऱ्या व्यक्तीची मालकीची असावी जी सध्या अस्तित्वात असावी किंवा सध्या परिस्थितीला संपत्ती देणारा व्यक्ती हा त्या संपत्तीचा मालक असावा भविष्यात येणाऱ्या संपत्तीचा या हस्तांतरण प्रकारात विचार केला जाणार नाही
2 ] Major Person -
संपत्तीचे बक्षीस पत्र करून देणारा व्यक्ती प्रौढ असावा तो मायनर नसावा
3 ] Sound Mind-
संपत्तीचे बक्षीस पत्र करून देणारा व्यक्ती त्यासाठी योग्य असावा तो मानसिक रुग्ण अथवा दिवाळखोर अथवा एखाद्या न्यायालयाने त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी अयोग्य घोषित केलेले नसावे
4 ] Lone & Other Assets
ज्या संपत्तीचे बक्षीस पत्र करून द्यावयाचे आहे त्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे किंवा कर्ज असेल तर त्यासंबंधी बक्षीस पत्रात नमूद करणे गरजेचे आहे व त्यासाठी बक्षीस पत्र करून घेण्याची स्वीकृती असावी
Transfer Profoperty Act 1882 Sec 124
कलम 124 प्रमाणे
भविष्यातील मालमत्तेचे बक्षीस पञ शून्य आहे.असे बक्षीस पञ करणेमुर्खपणाचे ठरेल ते अवैध असेल माञ ते नोंदवून ही घेतले जाणार नाही
Transfer of Property Act 1882 Sec 125
कलम 125 प्रमाणे
Two and more parties
दोन किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असेल किंवा दोन पेक्षा जास्त बक्षीस पञ स्विकारणारे असतील त्यातील एखादी वस्तू ज्यापैकी एखादी व्यक्ती ती स्वीकारत नाही तर ते बक्षीसपञ अवैध आहे जोपर्यंत त्याची स्विकृती मिळत नाही
Registration of Gift Deed |
बक्षीस पत्राची नोंदणी |
बक्षीस पत्र कसे तयार करावे
बक्षीस पत्रात कोणत्या गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे
1 ] बक्षीस पत्र करून देणाऱ्या चे नाव त्याचा सविस्तर पत्ता व त्याची सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे
2 ] बक्षीस पत्र करून घेणाऱ्या चे नाव त्याचा पत्ता व त्याची सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे
3 ] संपत्तीचे विवरण व बक्षीस पत्र करून देणारा त्याचा सदर संपत्तीवर अधिकार कसा निर्माण झाला आहे त्यासंदर्भात सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे
4 ] सदर संपत्तीवर कोणतेही कर्ज नसल्याचे डिक्लेरेशन करणे गरजेचे आहे अथवा कर्ज असल्यास बक्षीस पत्रात त्याचा उल्लेख करावा लागतो त्यासाठी करून घेणाऱ्या ची सहमती असणे आवश्यक आहे
5 ] बक्षीस पत्र करून देणाऱ्या वर अथवा बक्षीस पत्र करून घेणार यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याबाबतचे व दोघेही सध्या व निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचे बक्षीस पत्रात नमूद करावे लागेल
6 ] सदर संपत्तीचा बक्षीस पत्र करून घेणाऱ्याने स्वीकार केला आहे असे डिक्लेरेशन सदर बक्षीस पत्र देणे गरजेचे आहे
वरील सर्व इत्यंभूत माहिती देऊन तुमच्या राज्यात ठरलेल्या स्टॅम्प ड्युटी नुसार स्टॅम्पवर सदरची सर्व माहिती लिहून त्यावर बक्षीस पत्र लिहून देणार यांची स्वाक्षरी बक्षीस पत्र लिहून घेणार यांची स्वाक्षरी व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी झाल्यानंतर सब रजिस्टर यांच्याकडे बक्षीस पत्र नोंदवून घेणे गरजेचे आहे
बक्षिस पत्रा विषयी इतरत्र माहिती
बक्षीस पत्र हे विनामोबदला केले जाते त्यातून देणारे आता घेणाऱ्या कडून कोणताही आर्थिक अथवा अन्य मोबदला घेतला जात नाही
बक्षीसपत्राचे खंडन अथवा ते कधीही संपुष्टात येत नाही किंवा संपुष्टात आणले जाऊ शकत नाही.
बक्षीस पत्रासाठी लागणारा मुद्रांक शुल्क |
बक्षीस पत्र मुद्रांक शुल्क | gift deed stamp duty |
Article 34 of the Stamp Act of Maharashtra
महाराष्ट्रात गिफ्ट डीड स्टॅम्प ड्युटी
महाराष्ट्राच्या मुद्रांक कायद्याच्या कलम ३४ चे पालन करून महाराष्ट्रात गिफ्ट डीड आणि मुद्रांक शुल्क हे मालमत्तेच्या किमतीच्या ३% आहे
तसेच शेती अथवा राहणेसाठी संपत्तीचा वापर होत असेल तर रक्ताच्या नात्यात बक्षिसपञ करायचे असल्यास त्यासाठी केवळ 200 रुपये एवढेचं मुद्रांक शुल्क आकारले जाते
सदरिल नातेसंबधात नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नात, नातु, व मृतमुलाची पत्नी असे नातेवाईक असल्यास नाममाञ मुद्रांक शुल्क आकारले जाईल
Gift Deed Stamp Duty in Maharashtra
Gift deed and stamp duty in Maharashtra is 3% of the property's worth, following Article 34 of the Stamp Act of Maharashtra
What is the validity of gify deed? |बक्षीस पत्राची वैधता काय आहे?
मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 च्या कलम 123 अन्वये, स्थावर मालमत्तेची भेट देणगीदार आणि देणगीदार यांनी स्वाक्षरी केलेल्या आणि दोन साक्षीदारांनी प्रमाणित केलेल्या नोंदणीकृत गिफ्ट डीडद्वारे भेट दिली जाते तेव्हा वैध असते.
Registration of Gift Deedबक्षीस पत्राची नोंदणी
दोन्ही पक्षांनी पत्ता, नाव, जन्मतारीख आणि स्वाक्षरी यासारखी सर्व संबंधित माहिती नमूद करावी. गिफ्ट डीडमध्ये दोन साक्षीदार आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात. रक्कम भरल्यानंतर स्टॅम्प पेपरवर गिफ्ट डीड छापली जावी. ते पूर्ण झाल्यानंतर, ते निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत केले जावे.
Both parties should mention all relevant information like address, name, date of birth and signature. A gift deed should have two witnesses and their signatures. A gift deed should be printed on stamp paper once the amount is paid. Once that is done, it should be registered at the registrar's or sub-registrar's office.
बक्षीस पत्र रद्द करता येते का
बक्षीस पत्र करता येते. बक्षीस पत्र साध्या कागदावर स्वहस्ते लिखित स्वरूपात परंतु - पात्र (कायद्याच्या कक्षेत दिलेल्या व्याख्येत बसणाऱ्या ) व्यक्तीस - लिहून ठेवता येते व त्यास दोन साक्षीदारांच्या साह्या आवश्यक आहेत. परंतु - असे बक्षीस पत्रास कोर्टात आव्हान दिले जाते.
Income tax on gift deed |
बक्षीस पत्रावर आयकर |
बक्षीस पत्र स्टॅम्प ड्युटी
आयकर नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला वर्षभरात मिळालेल्या भेटवस्तूंना पूर्णपणे सूट आहे. परंतु या भेटवस्तूंचे मूल्य एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. एकत्रितपणे मिळालेल्या भेटवस्तूंचे मूल्य 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि आयकर आकारला जाईल.
वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का
■ वारसा हक्काने आलेल्या जमीन अथवा मिळकतीचे बक्षीस-पत्र करता येत नाही. तसेच वारसा हक्क सुधारित कायदा २०१५ नुसार - एखाद्या स्त्रीस माहेर कडून वारसा हक्काने आलेली जमीन मिळकतीचे (वारसा हक्काने आली असेल तरी संबंधित स्त्रीसबक्षिस पत्र करता येते ) बक्षिस-पत्र करता येते.
■ कोणीही व्यक्ती -स्वकष्टर्जित स्थावर अथवा जंगम मिळकत - स्वतःचे इचछेनुरूप आपल्या वारसांना वारसापैकी एकास - निरनिराळ्या हिस्स्यात वाटणी करणे- अथवा वारस सोडून स्वतः च्या इच्छेनुरूप - तिरहित व्यक्तीस अथवा धर्मदाय संस्था , देशास, देण्याची इच्छा लिखित स्वरूपात लिहून देण्यात येते, त्यास बक्षीस पत्र संबोधले जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा