आँनलाईन किंवा आँफलाईन बाजारातुन खरेदी केलेल्या वस्तु किंवा सेवांविषयी तुमची फसवणूक झाली आहे का | Have you been cheated about goods or services purchased online or in the marketplace
विकत घेतलेल्या सेवा व वस्तुं
विषयी फसवणूक झाल्यास
ग्राहक हक्क संरक्षण..
खरेदि केलेल्या सेवा अथवा वस्तुंविषयी फसवणूक झाली आहे काय |
Consumer Rights Protection ..
Have you been defrauded about services or goods purchased
मित्रांनो सध्या आँनलाईन खरेदिचा जमाना असुन अनेकविध वस्तु कपडे, घरगुती वापराच्या वस्तु , अथवा मोबाईल किंवा अनेक इलेक्ट्रॉनिक सामानाची खरेदि करतो व अनेकदा आपण वस्तू विकत घेण्यासाठी बाजारात अथवा एखाद्या दुकानात जातो किंवा अनेक प्रकारच्या सेवा विकत घेत असतो आणि काही दिवसानंतर आपल्या असे लक्षात येते की आपली यामागे फसवणूक झाली आहे त्यामुळे आपण आपले पैसे फुकट गेल्याचे म्हणतो किंवा डॉक्टर कडून सेवा घेतल्यास त्याचेही बऱ्याचवेळा पेशंट दगावतात व पैसे गेले आणि व्यक्तीही गेला असे म्हणतो मात्र अशा फसवणुकीने विरुद्ध तुम्ही दाद मागू शकता व तुमची नुकसान भरपाई मिळवू शकता ती कशी चला बघुया आपल्या ब्लॉगवर आपले कायदे आपला अधिकार
Customers Protection Act 1986
ग्राहक संरक्षण कायदा 1986
तक्रार कोण करू शकते
ग्राहक संरक्षण कायदा 1986 अनुसार एखाद्या फसवणूक झाल्यास सदरचे व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करू शकतात अथवा व्यक्तीकडून त्यांचा प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतो किंवा अनेक ग्राहकांकडून एक व्यक्तीही तक्रार दाखल करू शकते
तक्रार कोठे दाखल करता येईल
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
एक लाख ते वीस लाखांपर्यंत ची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल करता येते त्यासाठी एक लाख ते पाच लाख पर्यंत च्या तक्रारींना देयकाची आवश्यकता नसून त्या विनाशुल्क असतात तर पाच लाख ते दहा लाख पर्यंतच्या तक्रारींना दोनशे इतकेच देयक शुल्क आकारले जाते तर दहा लाख ते वीस लाख पर्यंतच्या तक्रारींना चारशे रुपये इतके देयक शुल्क आकारले जाते सदरील मंचआयोगाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची मुदत 30 दिवस इतकी असते
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करता येते अथवा वीस लाख ते एक कोटी रुपये पर्यंतचे दावे दाखल करता येतात त्यासाठी विस लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांना दोन हजार रुपये देयक शुल्क आकारले जाते तर पन्नास लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या दाव्यांना चार हजार इतके देयक शिल्लक आकारले जाते तसेच सदरिल आयोगाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची मुदत 30 दिवस इतकी असते
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्णयाविरोधात अपील केले जाऊ शकते तसेच एक कोटी पेक्षा जास्त भरपाई च्या केसेस राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल केल्या जातात व त्यासाठी पाच हजार इतके देयक आकारले जाते तसेच सदरील आयोगाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची मुदत 30 दिवस इतकी असते
सर्वोच्च न्यायालय
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाऊ शकते मात्र मात्र यानंतर कोठेही अपील केले जाऊ शकत नाही हा निर्णय अंतिम निर्णय असेल
दारिद्रय रेषेखालील अंत्योदय अन्न योजना कार्डधारक असणा-या तक्रारदारांनी सदर कार्डाची साक्षांकित प्रत दाखल केलेस ते सदर देय शुल्क अदा करण्यापासून सुट मिळणेत पात्र राहतील.
तक्रार दाखल करण्याची पध्दत
तक्रारही तुमच्या मातृभाषेत असू शकते त्यामुळे कामात सुसूत्रता असते
तक्रारीचे स्वरुप
1] तक्रारकर्त्यांचे नाव व पत्ता
2] विरुध्द पक्षकाराचे नावं / नावे, पत्ता/ पत्ते.
3] तक्रारसंबंधी तथ्ये किंवा वस्तुस्थिती आणि ती केव्हा व कोठे उद्भवली त्याबद्दलची माहिती.
4] तक्रारीतील आरोपांच्या पुष्टयर्थ काही कागदपत्रे असल्यास अशी कागदपत्रे.
5] तक्रारकर्त्याला अपेक्षित असलेल्या नुकसानभरपाईचे स्वरुप.
6] तक्रारकर्त्याने किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीने तक्रारीवर आपली स्वाक्षरी केली पाहिजे.
ग्राहकांचे तक्रारींचे विनाखर्चिक व झटपट निवारण करण्याची तरतुद करण्यात आली आहे व तसेच जिल्हा मंचाकडे राज्य आयोगाकडे अथवा राष्ट्रीय आयोगाकडे. सुनावणी व निकालाच्या दिवशी तक्रारदार किंवा त्याच्या प्रतिनिधीला व विरुध्द पक्षकारालाही हजर राहणे बंधनकारक आहे
• वस्तुचे विश्लेषण किंवा चाचणी करण्याची आवश्यकता असेल अशा बाबतीत विरुध्द पक्षकाराला नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून तिन महिन्यांच्या आत आणि वस्तूंचे विश्लेषण किंवा चाचणी करावयाची आवश्यकता असेल त्याबाबतीत पाच महिन्यांच्या आत राष्ट्रिय आयोग,राज्य आयोग किंवा जिल्हा मंच यांच्याकडून तक्रारीबाबत निर्णय घेतला जाणे आवश्यक आहे.
• सुनावणीच्या पहिल्या तारखेपासून शक्यतोवर 90 दिवसांच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे किंवा राज्य आयोगाने व जिल्हा मंचाने तक्रारीवर व अपिलावर निर्णय घेणे अपेक्षित असते
तक्रार करताना योग्य प्रकारे करावी त्यात चूक झाली तर नुकसानभरपाई मिळत नाही. व्यापारी, दुकानदार, कंपनी, डॉक्टर, केमिस्ट, हॉस्पिटलसंबंधी दावा करताना त्यांचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे. त्याच जिल्ह्यातील ग्राहक मंचाकडे दावा करावा. आपली तक्रार योग्य असेल तर गुन्हेगारास शिक्षा होते व खालीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळु शकते किंवा वस्तुतील व सेवेतील दोष दूर करणे किंवा वस्तू बदलून देणेअथवा दिलेली किंमत परत करणे अथवा झालेला तोटा किंवा सोसावी लागलेली झळ याबद्दल भरपाई देणे आदी पण दावा खोटा ठरला तर दावेदाराला दहा हजारांचा दंड होतो. तरी कृपया दावे करताना वकिलांचा सल्ला अवश्य घ्यावा

सदरच्या विषयावर अधिक सविस्तर माहिती देण्यात येणार असुन त्याविषयी मिळणारी नुकसान भरपाई कशी व किती असेल जास्तीत जास्त कशी वसुली करता येईल व त्यानंतरची सर्व प्रक्रिया
या पुढील भागात देण्यात येईल देण्यात आली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा