आवश्यक माहिती :-
तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचे तुम्ही वारस कसे व्हाल सविस्तर माहिती अवश्य वाचा
अनेकदा संपत्तीच्या वारसाहक्काबाबत लोकांमध्ये फारसे ज्ञान नसते आणि त्यामुळे भविष्यात अनेक वाद उद्भवतात व संपत्तीचे वारस व फेरफार कामी अडथळे निर्माण होत असतात व हे खटले अनेक वर्ष कायद्याच्या व न्याय दरबारात रेंगाळत असतात त्यामुळे वारसांचे योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे त्याच हेतुने स्ञीयांच्या संपत्तीचे अधिकार व त्यांचे वारस तसेच पुरुषांच्या संपत्तीच्या अधिकार व त्यांच्या वारसाबाबत चर्चा करणार आहोत आपले कायदे या ब्लॉगवर
Hindu Succession Act 1956
Order Of Succession Among
Heirs in The Schedule
हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956
कलम 9 अन्वये
वारसांचा क्रम ठरवण्यात आला आहे
महिलांना वारसा हक्कातून स्ञीधन अथवा स्वतः कमावलेल्या संपत्तीतून मिळालेल्या संपत्तीचा सर्वस्वी अधिकार त्या महिलेचा असतो व सन 2005 च्या हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 संशोधनानंतर स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीने हक्क दिले आहेत व हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 अंतर्गत त्यांच्या पश्चात वारसांमध्ये संपत्तीचे वाटप करता येते मात्र त्यासाठी मृत्युपत्र असेल तर संपत्तीचे वाटप हे इच्छापत्राच्या आधारे होते परंतु असे कोणतेही मृत्युपत्र नसेल तर त्यांच्या पश्चात त्याची संपत्ती त्याच्या वारसदारांला मिळते. वारसदार ठरवणं आणि संपत्ती वाटप हिंदू-उत्तराधिकारी अधिनियम, 1956 अंतर्गत वाटप करण्यात येते
स्त्रीयांच्या संपत्तीचे वारसहक्क
हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 कलम 15 अन्वये विनामृत्यूपत्र मयत झालेली हिंदू स्त्री खातेदाराची संपत्ती पुढील प्रमाणे वारसाहक्काने जाईल.
1] : यात असणाऱ्या
(A) मुलांना
(B) मुलींना
(C) मयत मुलाच्या /मुलीच्या मुलांना (नातवांना)
(D) पतीला
प्रत्येकी एक हिस्सा सम प्रमाणात देण्याची तरतूद आहे.
2] : प्रथम वर्गात वर सांगितलेले वारसदार हयात नसतील तर पतीच्या वारसदारांना संपत्ती मिळते.
3] : प्रथम व द्वितीय वर्गातील कोणीही वारसदार हयात नसतील तर स्ञीची संपत्ती तिच्या आई-वडिलांना मिळते
4] : वरीलपैकी कोणीही वारसदार नसतील तर स्त्रीच्या वडिलांच्या वारसदारांना संपत्ती मिळते.
5] : वरील कोणी वारसदार नसतील तर तिच्या आईच्या वारसदारांना संपत्ती जाते.
तथापि, हिंदू स्त्री जर विनामृत्यूपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्त्रिच्या पित्याच्या वारसाकडे जाईल आणि स्त्रिला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासर्याकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास, मृत स्त्रिच्या पतीच्या वारसाकडे जाईल
वरील पैकी कोणीही नसल्यास स्त्रीची मालमत्ता सरकार जमा होते.
पुरुषांच्या संपत्तीचा वारसा हक्क
पुरुषांचे वारसदार म्हणजे नातेवाईक, हे प्रामुख्याने दोन वर्गांत मोडतात:
वर्ग 1 मधले वारसदार -
मुले, मुली, विधवा पत्नी (एक /अधिक), आई, आधी वारलेल्या मुलाचा मुलगा (नातू) अथवा वारलेल्या मुलाची विधवा पत्नी आणि पुढील आणखी एक पिढी. या सर्वांनी एकाच वेळी आणि प्रत्येकी एक हिस्सा मिळतो. वर्ग 1 मधला कोणीही हयात नसेल तर सर्व मिळकत वर्ग 2 मधल्या व्यक्तींना मिळते.
वर्ग 2 मधले वारसदार –
यांची विभागणी खालील प्रवर्गांमध्ये अनुक्रमे केली जाते आणि पहिल्या प्रवर्गातली व्यक्ती एकत्रितपणे सर्व मिळकत वाटून घेतात. पण पहिल्या प्रवर्गात कोणीच हयात नसेल तर मालमत्ता दुसऱ्या प्रवर्गातल्या वारसदाराकडे जाते. दुसऱ्या प्रवर्गातल्या वारासदारांपैकीही कोणी हयात नसेल तर तिसऱ्या अशा क्रमाने वाटणी केली जाते.
वर्ग 2 मधला पोटविभाग ( प्रवर्ग) –
प्रवर्ग 1 : वडील
प्रवर्ग 2 : (A) मुलाच्या मुलीचा मुलगा, (B) मुलाच्या मुलीची मुलगी, (C) भाऊ, (D) बहीण
प्रवर्ग 3 : (A) मुलीच्या मुलाचा मुलगा, (B) मुलीच्या मुलाची मुलगी, (C) मुलीच्या मुलीचा मुलगा, (D) मुलीच्या मुलीची मुलगी
प्रवर्ग 4 : (A ) भावाचा मुलगा (B ) बहिणीचा मुलगा (C) भावाची मुलगी (D) बहिणीची मुलगी.
प्रवर्ग 5 : (A) वडिलांचे वडील (B) वडिलांची आई
प्रवर्ग 6 : (A) वडिलांची विधवा पत्नी (B) भावाची विधवा पत्नी
प्रवर्ग 7 : (A) वडिलांचा भाऊ, (B) वडिलांची बहीण
प्रवर्ग 8 : (A) आईचे वडील (B) आईची बहीण
प्रवर्ग 9 : (A) आईचा भाऊ, (B) आईची बहीण
वर्ग 2 मधले कोणीही वारस नसतील तर मालमत्ता गोत्र-संबंधांना (म्हणजे पुरुषाकडून रक्ताचं नातं किंवा दत्तकपुत्र) आणि तेही नसल्यास गणगोञ संबंधांना आणि तेही नसतील तर सरकार जमा होते.
उत्तराधिकार प्रमाणपत्र
(Succession certificates)
एखादा व्यक्ती मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीचा वा सात किंवा अधिक वर्षे परागंदा असलेली व्यक्तीचा कायदेशीर वारसप्रमाणपञ मिळविण्यासाठी व व्यक्तीचा कायदेशीर वारसांबाबत संभ्रम असल्यास दिवाणी न्यायालयाकडून वारस दाखला मिळवावा लागतो. यासाठी मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे गरजेचे असते
वारस प्रमाणपञ कसे मिळवावे /
वारस दाखला कसा काढावा
(Succession Certificate)
दाव्याची प्रक्रिया
1 दावा करणार्याचे नाव,
2 संपुर्ण पत्ता,
3 रेशन कार्ड पॅन कार्ड
4 मयत व्यक्तीशी असलेले नाते
5 मयत व्यक्तीचे अन्य वारस आणि त्यांचे पत्ते
6 वारसांचे पॅन कार्डस्
7 रेशन कार्ड
8 वंशावळ
9 मयताचा मृत्यू दाखला
10 मयत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचा संपूर्ण तपशील नमुद असावा.
अर्जावर कोर्ट फी अधिनियम 1870 अन्वये आवश्यक ती कोर्ट फी अदा करावी. दावा दाखल झाल्यानंतर, न्यायालय 45 दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द करते. जर त्याबाबत कोणाचीही तक्रार प्राप्त झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व प्रक्रियेला अंदाजे 5 ते 7 महिन्यांचा कालावधी लागतो.
वारसपञावर सुनावणी
भारतीय उत्तराधिकार अधिनियम, 1925 च्या कलम 370 अन्वये उत्तराधिकार प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे. कोणत्याही मयताच्या स्थांवर मालमत्तेबाबत वारसांमध्ये वाद असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक असते. असे प्रमाणपत्र प्रदान करण्यापूर्वी न्यायालयातर्फे दोन्ही पक्षांना त्याची बाजू आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात येते.
पतीच्या मिळकतीत घटस्फोटीत पत्नीला हिस्सा मिळणार नाही
एखाद्या दांम्पत्याचा घटस्फोट झाल्यावर पती मृत्यु पावल्यास घटस्फोटित पत्नीला संपत्तीत पण आता हिस्सा मिळणार नाही घटस्फोटित पतीच्या हयातित अस तांनाघटस्फोटित पत्नीने दुसरे लग्न केले असेल तर तिला घटस्फोटित पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या मिळकतीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असणार नाही.
विधवा स्ञीने पुनर्विवाह केल्यास तिला मयत पतीच्या मिळकतीत हिस्सा मिळेल
पत्नीच्या पतीचे निधन होताच पत्नीचा वारसा हक्क सुरू होतो. पतीच्या निधनानंतर त्याची विधवा पत्नी हिंदू वारसा कायदा 1956 कलम 14 अन्वये मयत पतीच्या मिळकतीची परिपूर्ण मालक ठरते. अशा हिंदू विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यास तिचा हिंदू वारसा कायदा 1956 कलम 14 अन्वये मिळालेला हक्क नष्ट होत नाही त्यामुळे सदर संपत्ती हि त्या महिलेच्या मालकीची कायम असते व त्या संपत्ती संदर्भात सर्व अधिकार त्या महिलेला प्राप्त झालेल्या असतात
एखाद्या पुरुषाचे दोन लग्न झाले असल्यास त्याच्या कायदेशीर वारसबाबत
हिंदू विवाह कायदा 1955 कलम 5 मध्ये विवाहाचे नियम आहेत त्यानुसार विवाहाच्या प्रसंगी वर आणि वधू पैकी कोणीही मनोविकल, मानसिक रूग्ण, भ्रमिष्ट, अपस्माराचे झटके येणारा, वयाने अज्ञान, मुलाच्या वडिलांकडील नातेसंबंधी नसावा असे असल्यास दुसरा विवाह कायद्याने मान्य केलेला असेल
हिंदू विवाह कायदा 1955 कलम 17 व 18 अन्वये, विवाहाच्या प्रसंगी वराची पत्नी आणि वधुचा पती हयात नसावा वधू चा पती किंवा पतीची वधु हयात असेल व कायदेशीर घटस्फोट झालेला नसेल तर भारतीय दंड संहिता 1860 कलम 494 अन्वये हा गुन्हा आहे. बेकायदेशीरपणे लग्न झालेल्या दुसर्या पत्नीला नवर्याच्या मिळकतीत हक्क घेता येत नाही. दुसरे लग्न अवैध असल्यामुळे आणि दुसर्या पत्नीला न वर्याच्या मिळकतीत हक्क घेता येत नाहीमाञ हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 16(3) अन्वये अनौरस संततीला वडिलांच्या स्वकष्टार्जित तसेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वारसाहक्क आहे असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने सन 2011 मध्ये रेवनसिदप्पा वि. मल्लिकार्जून या केसमध्ये दिनांक -31/3/2011 रोजी दिला
त्यामुळे अशा केसेसमध्ये मयताचा वारस नोंदीमध्ये मयताची पहिली पत्नी व मुले/मुली तसेच दुसर्या पत्नीची सर्व आपत्ये यांचे नावे नोंदवावी लागतात माञ दुसऱ्या पत्नीला वारस सदरी नाव दाखल करतायेणार नाही तसेच स्थानिक चौकशी करुन पंचमंडळीचा पंचनामा घेणे आवश्यक असते व वारस नोंद मंजूर करून त्याचा फेरफार नोंदवला जातो नोटीस बजावल्यानंतर जर दुसर्या पत्नीने हरकत नोंदवली तर मंडळ अधिकार्यांनी तक्रार केसची सुनावणी घ्यावी. सर्वांचे म्हणणे नोंदवावे. व दुसर्या पत्नीला दिवाणी न्यायालयातून तिचा वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगावा.
वारसपञ/ फेरफार नोंद नोंदविण्याआधीच सर्वांनाच दिवाणी न्यायालयातून वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगावे. जेणेकरुन वारसांचा कोणताही हक्क डावलला जाणार नाही
वडिलोपार्जित संपत्ती व वारस
वडिलोपार्जित म्हणजे तीन पूर्वज वडिल ,आजोबा , पंजोबा अशा पिढ्यांकडून वंशज या नात्याने प्राप्त झालेली मिळकत अशा मिळकतीमध्ये मुलगा, नातू, पणतू यांना जन्मतः हक्क प्राप्त होत असतो तीन पूर्वजांच्या पलिकडे, चौथ्या पिढीकडून म्हणजे खापर-पणजोबां कडून मिळालेली संपत्ती वडिलोपार्जित मानली जात नाही.
वडिलोपार्जित मालमत्ता वाटप
वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो जर कुणाच्या कुटुंबात चार मुलं असतील तर पहिली वाटणी चार मुलांमध्ये होईल आणि तिसऱ्या पिढीच्या अपत्यांना म्हणजेच त्या व्यक्तीच्या नातवांना ती संपत्ती त्यांच्या वडिलांच्या हिश्शातून मिळते माञ 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली व त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असं निश्चित झाले
आधीच वाटणी झालेली मालमत्ता
जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क नाही. कारण या प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतील. ही वाटणी रद्द करता येणार नाही.
वडिलोपार्जित संपत्तीचा हक्क कधी संपुष्टात येतो
जर वडिलांनी आपल्या हयातीत मुलाला बक्षीसपत्राने संपत्ती हस्तांतरीत केली आणि ती संपत्ती विकण्याचे, हस्तांतरण करण्याचे अधिकार स्पष्टपणे त्या दस्ताने दिले असले तर ती संपत्ती वडिलोपार्जित मिळकत ठरत नाही. त्यामुळे मुलगा नातू, पणतू यांना त्या मिळकतीत मालकी जन्मानेच हक्क प्राप्त होत नाहीत. पण वंशपरंपरेने उपभोग घेण्याच्या संदर्भात उल्लेख असेल तर अशावेळी पुढिल पिढ्यांसाठी उत्तराधिकार निर्माण होतो किंवा कधीकधी वाद उपस्थित होऊ शकतो. तसेच वडिल, आजोबा ,पंजोबा या पूर्वजांच्या व्यतिरिक्त मिळकत ही काका, मामा, मावशी, आजी अथवा अन्य कोणाकडून बक्षीसपत्र वा मृत्युपत्राद्वारे मिळाली असेल तर ती संपत्तीदेखील वडिलोपार्जित मानली जात नाही. ती स्वअर्जित असल्याने त्यामध्ये मुलगा/मुलगे, नातू, पणतू यांचा काहीही हक्क नाही. त्यामुळे ती विकताना त्यांच्या संमतीची आवश्यकता नाही.
मालमत्ता शेवटच्या (निपुत्रिक) सहदायदाकडे असेल, तर ती सामाईक मिळकत देखील स्वकष्टार्जित मानली जाते व ते विकण्याचे सर्व अधिकार त्या व्यक्तीला असतात. नंतर मुलगा जन्माला आला तर उर्वरित संपत्तीमध्ये त्याला हक्क प्राप्त होतो पण पूर्ण झालेल्या व्यवहाराला त्याला हरकत घेता येणार नाही. वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलांची सामाईक मालकी संभवत नाही. त्यामुळे अशा संपत्तीत मुलांना कोणताही हक्क नसल्याने वडील त्या संपत्तीची विल्हेवाट त्यांच्या मर्जीनुसार करू शकतात
वडिलोपार्जित संपत्ती नसेल तर त्यावर कुणाचा हक्क
जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजे स्वःअर्जीत संपत्ती असेल तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची याचा सर्वस्वी अधिकार संपत्ती धारकाचा आहे त्याच्या जिवंतपणी किंवा त्याच्या पश्चात ती संपत्ती कुणाच्याही नावे करू शकतो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा