जमीन N.A. (बिगर शेती) कशी करावी

 

 
non agricultural, dharani non agriculture portal, dharani portal non agriculture, non agricultural property registration, non agricultural land	, dharani portal for non agricultural properties, non agricultural land registration, dharani non agriculture	, non agricultural, non agricultural activities
जमीन N.A. (बिगर शेती) कशी करावी

आजकाल विकासाच्या गरजा, राहण्याच्या सोयी आणि उद्योग व्यवसायांमुळे जागेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पडीक, निरुपयोगी जमिनी ज्या ठिकाणी वस्ती किंवा गाव वाढलेलं आहे अशा ठिकाणी शेतजमिनीत रहिवास किंवा व्यावसायिक विकास करायचा असेल तर त्या जमिनीला अकृषी Non Agriculture  जमिनीत रूपांतरित करणे आवश्यक असते.



जमीन NA (बिगर शेती) कशी करायची?

बऱ्याच लोकांना NA करण्याची प्रक्रिया माहित नसते. काहींना माहित असली तरी तिचे पूर्ण ज्ञान नसते. NA प्रक्रियेत कोणत्या पायर्‍या असतात आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, याची सविस्तर माहिती घेऊ.



महाराष्ट्र जमीन महसूल कायदा

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६९ नुसार, शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याही विकास कामासाठी करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे.



ग्रुपने जागा खरेदी करणे

काही लोकांना फार्म हाऊस, पर्यटन किंवा विश्रांतीसाठी जागा NA करायची असते. अशा ठिकाणी एकट्याने खरेदी करण्यापेक्षा ग्रुपने खरेदी करणे उत्तम असते त्यामुळे तुकडेबंदि होत नसुन नियमानुसार खरेदिसाठी अडचण येत नाही



जमीन NA (बिगर शेती) करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

१.  जिल्हाधिकारी कार्यालयातील फॉर्म भरून कोर्टाचा स्टॅम्प असणे आवश्यक असतो
२.  ७/१२ उताऱ्याचा ४ झेरॉक्स प्रती
३.  फेरफार नोंदींच्या प्रती.
४. महसूल विभागाकडून कोणतेही रेकॉर्ड आढळले नसल्यास प्रमाणपत्र.
५.  ८ अ चा उतारा.
६.  भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयातून जमिनीचा नकाशा.
७.  इमारतीसाठी बिल्डिंग प्लॅनच्या ८ प्रती.
८.  चालू ७/१२ उतारा.
९.  महामार्ग प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र.
१०.ग्राम पंचायती किंवा महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र.
११.बॉम्बे वहिवाट कायद्यांतर्गत परवानगी ४३/६३ नुसार.
१२.शेतकरी सहकारी विकास सेवा सोसायटीचे कर्ज नसल्याचा दाखला.
१३. जमीन NA करताना तलाठ्याचं पत्र.




जमीन NA करताना भरावा लागणारा नजराणा

  • शेतजमिनीचे रहिवासी जमीनमध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या किमतीच्या ५०% रक्कम भरावी लागते

  • शेतजमिनीचे व्यावसायिक जमीनमध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या बाजारभावाच्या ७५% रक्कम भरावी लागते.

  • शेतजमिनीचे निम-सरकारी जमीनमध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या बाजारभावाच्या २०% रक्कम भरावी लागते.

  • रहिवासी जमीन औद्योगिक मध्ये रूपांतर केल्यास जमिनीच्या किमतीच्या २०% रक्कम भरावी लागते.



जमीन NA करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा

१. जमीन NA करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
२. अर्ज आल्यावर जिल्हाधिकारी तहसीलदारांना अर्ज पाठवतात.
३. तहसीलदार अर्जाची छाननी करतात.
४. तहसीलदार तलाठ्यांकडून जमिनीची चौकशी करतात.
५. तहसीलदार जमिनीची NA केल्यास पर्यावरणीय अडचणी किंवा प्रकल्पास धोका होणार नाही ना याची पडताळणी करतात.
६. तपासणी पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी जमीन रूपांतराचा आदेश काढतात.
७. आदेश झाल्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची NA नोंद केली जाते.



निष्कर्ष

NA प्रक्रियेमुळे जमिनीच्या उपयोगात बदल करता येतो. ही प्रक्रिया सखोल तपासणी आणि कागदपत्रांची आवश्यकता असते. योग्य नियोजन, कागदपत्रांची पूर्तता आणि सरकारी परवानग्या या सर्व बाबी समजून घेतल्यास, जमीन NA प्रक्रियेत यशस्वी होऊ शकते.



 

FAQs

1. NA जमीन म्हणजे काय?
   NA जमीन म्हणजे शेतजमिनीला अकृषी जमीन म्हणून रूपांतरित केलेली जमीन.

2. NA प्रक्रिया कशी केली जाते?
   जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करून कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया केली जाते.

3. जमीन NA करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
   फॉर्म, ७/१२ उतारा, फेरफार उतारा, ८ अ उतारा, बिल्डिंग प्लॅन, आणि अन्य प्रमाणपत्रे.

4. NA प्रक्रियेस किती वेळ लागतो?
   प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः काही आठवड्यांचा कालावधी लागतो.

5. NA प्रक्रिया कोण करू शकतो?
   जमिनीचा मालक किंवा त्याचे प्रतिनिधी ही प्रक्रिया करू शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आवश्यक माहिती बक्षीसपञ सविस्तर माहिती | Gift Deed

अतिशय महत्त्वाची माहिती :- हा कायदा तुम्हाला माहित असेल तर पोलिसही अटक करण्यास घाबरतील | Very important information if you know this law Police will also be afraid to make arrests

कोर्ट मँरेज | Court Marriage सविस्तर माहिती | Detail information about Court Marriage