आवश्यक माहिती - मालमत्ता खरेदी-विक्री करत असाल तर बघा हि माहिती | important information | If you are buying and selling property, see this information
आवश्यक माहिती - मालमत्ता खरेदी-विक्री करत असाल तर बघा हि माहिती | If you are buying and selling property, see this information
संपत्ती खरेदी विक्री करतांना
प्लॉट, फ्लॅट , बंगलो, रो-हाऊस, आदि संपत्ती खरेदी करताना कोणकोणत्या कागदपत्रांची तपासणी करावी याविषयी बघणार आहोत आपले कायदे या ब्लाँगवर
Maharashtra ownership Act 1964
अंतर्गत म्हणजेच प्लॅटच्या करारनाम्यासंबंधी गोष्टींचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यामुळे नविन बिल्डींगमध्ये घर घेतांना अथवा पुन्हा घर विकतांना या कागदपञांची माहिती घ्यावी
- बिल्डिंग ज्या जागेवर बांधण्यात आलेली आहे किंवा ती सदर बिल्डिंगचे काम सुरु (under construction) अवस्थेत असेल तर त्या जमिनीचे मुळ कागदपत्र तपासावेत जसे कि ७/१२ उतारा, खाते ऊतारा, फेरफार नोंदी , प्रॉपटी कार्ड , नकाशा, आवश्यक असल्यास ड पञकाची प्रत इ. तसेच त्या जमिनीचा मालक कोण आहे आणि बिल्डर किंवा विकासकाने हया जमिनीबाबत हस्तांतरणाचे योग्यते कागदपञ जसे की खरेदिखत, बक्षीसपञ,करारनामा आदि कागदपञांची पडताळणी करणे गरजेचे आहे
- Title Deed (मालकी हक्क) संबंधीचे व्यवहार पूर्ण केलेले असाल्याची खाञी करणे गरजेचे आहे
- सदर शेतजमिनीवर, किंवा गावठाण जमिन अथवा पडिक जमिनीवर बिल्डींगचा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी ती जमिन बिनशेती (एन. ए.) केलीअसल्याचे प्रमाणपत्र तपासणे जरुरीचे आहे. असे प्रमाणपञ नसल्यास बिल्डिंगचे काम अवैध ठरवले जाईल
- बिल्डींगचा आराखडा (नकाशे किंवा प्लॅन) नगरपालिका महानगरपालीका किंवा नियुक्त नगरविभाग अधिकारी यांचेकडून किंवा सिडकोची मान्यता मिळाली असल्यास बिल्डरला / विकासकाला त्यासंबंधीचे "प्रारंभ प्रमाणपत्र" देण्यात येते. सदर प्रमाणपञ तपासुन घेणे ही महत्त्वाचे असते
- सदर घर मालक अथवा बिल्डरने घराचे Agreement नुसार दिलेल्या कालावधीत रजिस्ट्रेशन पुर्ण केलेले असाल्याची खाञी करणे गरजेचे असते
- घर विक्री संदर्भात झालेले आर्थिक व्यवहाराची अगदी शिल्लक राहिलेल्या रक्कमेची देखील पूर्तता केलेली आहे का याची खाञी अवश्य करा जर आर्थिक देवाणघेवाण अपुर्ण असेल तर सदर व्यवहार अवैध मानला जाईल त्यामुळे झालेल्या व्यवहाराचे legal transaction झाले असल्याची खाञी करणे गरजेचे आहे
- महानगरपालिका, नगरपरिषद , किंवा ग्रामपंचायत किंवा त्या स्वरूपाच्या इतर कार्यालयांत बिल्डर अथवा विक्रेत्याने त्या बिल्डींगच्या जमिनीचा मालक म्हणून केलेली नोंद पाहणे आवश्यक आहे
- बर्याचवेळा second party घर विकत असेल अशा वेळी सदर लोकांनी सोसायटी स्थापन केली असेल तर त्यात सभासद म्हणून घर विकणार्या व्यक्तीच्या नावाची नोंदणी आहे का याची खाञी अवश्य करा
- संपत्ती विकणार्या व्यक्तीने सदर घराचे आतापर्यंतचा मेटेंनन्स चार्ज, लाईट बिल ,पाणी पट्टी, घरपट्टी इ. शासकीय कर व्यवस्थीत भरले आहेत किंवा नाही याचिही खाञी करणे आवश्यक आहे
- जर एखादी व्यक्ती ब्लॉक ,गाळा, घर , प्लाँट विकत घेणार आहात ती संपत्ती बैंक अथवा ग्रुहकर्ज देणा-या संस्थांकडे तारण (गहाण, लिज, लोन, नजरगहाण, ताबेगहाण) ठेवला नसल्याची खाञी करणे आवश्यक असते.
- घर, ब्लॉक, गाळा को.ऑ.हौ. सोसायटी अंतर्गत येत असेल तर त्या सोसायटीचे खरेदी / विक्री व्यवहारासंबंधी सोसायटीकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे.
- अनिवासी भारतीयांचा (एन.आर.आय.) व्यक्तीचा ब्लॉक विक्रीचा मुददा असेल तर त्यावेळी इन्कम टॅक्स अधिका-याकडून त्या व्यक्तीला मुक्ततेचे प्रमाणपत्र (एग्झेम्शन सर्टिफीकेट) मिळाले आहे का, हे पाहणे जरूरी आहे
वरीलप्रमाणे पाहिलेले मुद्दे साधे वाटत असले तरी ते तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांतील निकष वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा मुद्दा असेल तर बदलतील. त्यामुळे संपत्ती खरेदी अथवा विक्री करतांना कायदेशीर सल्ला घेणे व मालमत्ता खरेदी-विक्री करणे म्हणजे पुढे उद्भवणा-या अडचणी, धोके ,पैशाचा अपव्यय, वेळेचे नुकसान हे टाळता येऊन कायदेशिर मार्गाने मालमत्ता घेणे हे अत्यंत चांगले व आजच्या काळात जरूरीचे आहे. ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या संदर्भात सद्य स्थितीत (रे. रा.) रियल इस्टेट रेगुलेटरी अँक्ट २०१६ करण्यात आला आहे त्यामुळे याविषयी अधिक माहिती पुढील पोस्टमध्ये सविस्तर देण्यात येईल
(क्रमशाः)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा